दह्यारीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, समृद्धीसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी… आता एक पाऊल विकासाकडे!
माझ्या दह्यारीतील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, हेच माझे ध्येय आहे. राजकारण हे माझ्यासाठी केवळ समाजसेवेचे माध्यम आहे.”
शुद्ध पाणी आणि आरोग्य: गावातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी आणि उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
महिला सक्षमीकरण: बचत गटांना केवळ कागदावर न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष व्यवसायाची जोड देऊन महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
पायाभूत सुविधा: गावातील रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था (ड्रेनेज) आणि पथदिव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडवणार.
तरुणांना संधी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासासाठी गावातच सोयी उपलब्ध करून देणे.
शिक्षण: जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण आणि डिजिटल क्रांती.
स्वच्छता‘: सुंदर आणि स्वच्छ दह्यारी’ मोहिमेद्वारे सांडपाण्याचं योग्य नियोजन.
शेती: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा आणि मार्गदर्शन केंद्र.
सुरक्षा: गावातील महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि ग्राम सुरक्षा यंत्रणा
Candidate: Sou. Ashwini Shrirang Patil
Address: At Post – Dahyari, Taluka – Palus, District – Sangli, Maharashtra – 416309.
Contact Number: +91 9970243000
Email Address: info@ashwinipatil.com
Official Website: www.ashwinipatil.com
© 2025 Created by Accuresoftech